गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

गणानां त्वां......

गणानां त्वां......

   गणपती ही विद्येची देवता म्हणून सर्वविदित आहेच.पण त्या दिवशी गणेश सहस्त्रानामावालीतले एक नाव वाचताच मनात गणपती आणि शिवपरिवाराच्या एका वैशिष्ट्यावर विचार सुरु झाला.तो म्हणजे जनुकीय तंत्रज्ञान आणि गर्भ संबंधी विद्या !आदिपुरुष,सर्वज्ञानी अश्या शिवाने स्वत:च्या आणि पार्वतीच्या तेजा पासून निर्मिती केली कार्तिकेयाची.पण त्या गर्भाचे पोषण गर्भाशयाबाहेर झाले.काहींच्या मते गंगेमध्ये,मातीच्या घड्यात,तर काहींच्या मते अन्य गर्भाशयात. त्या गर्भाचा जन्मही अयोनिज !ही कथा वाचल्या नंतर तर आधुनिक test tube baby ची आठवण येते.नंतर झालेला गणपती हा तर पार्वतीच्या प्रतिभेचा,विद्येचा प्रत्यक्ष अवतार  !पुराणात जरी तिच्या अंगाच्या मलापासून उत्पत्ती झालेली असल्याच म्हणतात तरी विचारांती पार्वती आणि शिवाच्या कोशाणूंचा   संयोग करून निर्मिती झाली असल्याचा संभाव वाटतो. एका कथेत तर ब्रम्हा,विष्णू आणि महेश हे त्रिदेव संशोधक,सर्व देवांमधले उत्कृष्ट गुण एकत्र करून गुणाधीशाची निर्मिती करून,पार्वतीच्या गर्भात त्या पिंडाला प्रविष्ट करतात अस म्हंटल आहे.पुन्हा इथेही genetically mutated embryo आणि IVF तंत्रज्ञानाचा वापर असल्याच जाणवते.शिव-पार्वतीला जगत्पिता  आणि जगन्माता म्हणतात ते म्हणूनच का ?
           कार्तिकेय हा तर तीव्र बुद्धिमत्तेच प्रतिक !पण दुसर वैशिष्ट्य म्हणजे मूढमतिला प्राकृत करण्यासाठी त्याची आराधना करतात.मतिमंद मुलांवर झालेल्या एका प्रयोगात कार्तिकेयाची अठावीस नाव असलेल्या प्रज्ञा विवर्धन स्तोत्राच्या पठणाने त्यांच्यात सकारात्मक बदल झाल्याच निरीक्षण नोंदवल्या गेल.प्रज्ञा वाढवणारा आणि मुक्यांना वाचस्पती करणारा कार्तिकेय neurologist आणि speech therapist होता का ? इथे मला पुन्हा,आपल्या डमरू मधून शब्दनिर्मिती करणारा रुद्र आठवतो.पित्याचे संशोधन पुत्राने पुढे नेले असेल कदाचित.
  आणि गणपती ? तो तर साक्षात गर्भाशयाची अधिष्ठात्री देवता आहे.गर्भापाल नावाने त्याचा गौरव केला गेला,तो का ? आयुर्वेदात शरीराचा,नाभी खालचा भाग हा अपान वायुच्या अधिकारात येतो.इथेच गर्भाशय आहे,मूलाधार  चक्रही इथेच आहे.आणि त्याची देवता गणपतीच! प्रत्येक नवनिर्मितीत त्याचेच अधिष्ठान,त्याचाच वास.गर्भाचे पोषण,वाढ होण्यासाठी आवश्यक सामुग्री गणपतीसोबत जुळलेली आहे.बाळंतपनात  वापरल्या जाणारी वनस्पती असो,पदार्थ असो,कुठे न कुठे तरी त्याचाशी संबंधीत.मग ती गर्भादानासाठी वापरली जाणारी दुवा असो किंवा गर्भाशयाला बळ देणारी पंचा खाद्यात्ली खारीक असो.तिथेही गणपतीच !त्याच सोबत कार्तीकेयाप्रमानेच हा सुद्धा सर्व विद्यांचा कारक !सर्वासिद्धीदायक बुद्धिदाता !पुन्हा मस्तिष्क आणि धी,धृती आणि स्मृतीचा संबंध आला.
   हे सगळं बघता असं वाटते की ही सगळी family च  genetics and reproduction मध्ये संशोधन करणारी असेल.त्यातही उत्कृष्ट असं.विश्वाला उपयोगी पडणारे,कल्याणकारी शोध केल्याबद्दल त्यांना देवांमध्ये आढळ स्थान मिळालं.
 त्या शिवपरीवाराला माझं  सादर,सविनय साष्टांग नमन !

पूर्णिमा देशमुख पुरेकर -



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा