दक्ष प्रजापती - कठोर पालक ; प्रेमळ पिता
" प्रसूति , माझ्या मुलीला,सतीला, योगनिद्रेतून बाहेर काढण्यासाठी मी माझ्या सगळ्या शक्ती तिला देईन. पण तिला मी वाचवेन. " दक्षाचे बोलणे ऐकताच दक्षपत्नी दचकली.
"स्वामी, तुमच्या शक्ती गेल्या तर तुमचे सृष्टी नियंत्रित करण्याचे कार्य तुम्ही कसे करणार ? प्रजापतीच राहणार नाही तर प्रजेचे पालन कोण करणार ? "
सतीला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो,प्रसुति. त्या अघोरी संन्यासी शिवाचा स्पर्श सुद्धा माझ्या मुलीला होऊ देणार नाही. मी एक सामान्य पिता बनून राहीन पण हे होऊ देणार नाही. "
योगसमाधीत मग्न शिवाचे नेत्र खाडकन उघडले. अंतर्मनातून तीव्र निषेध व्यक्त झाला. " नाही, हे होता कामा नये."
दक्ष आपल्या सगळ्या शक्ती घेऊन सतीच्या दालनात जाऊ लागला. आणि क्षणार्धात प्रत्यक्ष शिवशंभू सतीच्या दालनात प्रकट झाले आणि त्यांनी सतीच्या भ्रूमध्याला स्पर्श केला. सती योगनिद्रेतून जागी झाली. महादेवाला पाहून हर्षित झाली. तिला वाटले कि शिव फक्त तिच्यासाठीच आले. पण तिचा भ्रम दूर करण्यासाठी महादेव म्हणाले,
" सती, वसंतोत्सवामध्ये तू मला नृत्यासाठी आमंत्रित केले, मी आलो, पण माझ्या स्पर्शाने तू योगनिद्रेत चालली गेलीस. केवळ माझ्या पुनःस्पर्शानेच तू त्यातून बाहेर येऊ शकत होतीस. पण तुझ्या पित्याला हे मान्य नव्हते. त्यासाठी त्याने आपल्या सगळ्या शक्ती तुला देऊन तुला वाचवायचे ठरवले. असे झाले असते तर दक्ष " प्रजापती " न राहता एक सामान्य पिता राहिला असता. त्यामुळे सृष्टी अनियंत्रित झाली असती. असे होऊ नये म्हणून मी इथे त्वरेने आलो. दक्ष प्रजापतीचे पद अबाधित ठेवण्यासाठी मी इथे आलो. सती , यापुढे तू मला बोलावू नकोस. तुझ्या पित्याच्या आदेशांचे पालन करण्यातच तुझे भले आहे. "
एव्हढे बोलून शिव तिथून अंतर्धान पावले. तेवढ्यात दक्ष तिथे आपल्या शक्ती घेऊन आला. पण सतीला जागृत झालेले पाहून चकित झाला. सतीने त्याला सगळं सांगितले. पण दक्ष क्रोधीत झाला. त्याला वाटले कि शिवाने त्याचा पाणउतारा करण्यासाठीच मुद्दाम असे केले. शिवप्रति त्याचे शत्रुत्व अजूनच तीव्र झाले.
पुढची कथा तर माहितीच आहे.
इतके वर्ष मी "दक्ष प्रजापती " कडे नकारात्मक नजरेनेच बघत आले. एक अहंकारी, आत्मकेंद्री, शिवाचा कट्टर शत्रू या दृष्टीनेच त्याला पाहत होते.कथा कहाण्या आणि सिरिअल्स मध्ये सुद्धा त्याचे तसेच रूप दाखवले जाते. शिव आणि सतीच्या लव स्टोरी मधला villain !
पण काही दिवसांपूर्वी देवोंके देव महादेव सिरीयल बघितल्या गेली आणि मग दक्ष प्रजापती या व्यक्तीरेखेकडे बघण्याची नजर बदलू लागली.
खरं म्हणजे शिव आणि दक्ष यांचे वैमन्यस्क हे व्यक्तिसापेक्ष नसून विरुद्ध विचारसरणी मधली तफावत आहे असे वाटते.
शिव हा कुठल्याही नियमबद्ध चाकोरीच्या बाहेर राहणारा ; स्मशानवैरागी ! तर दक्षाची निर्मिती हीच मुळात सृष्टीला एका नियमबद्ध चाकोरीत नियंत्रित करण्यासाठी झालेली. समाजाला एक शिस्त लावण्यासाठी, प्रजेला अनाचार,स्वैराचार यापासून दूर ठेवून समाजाला विकसित करण्यासाठी, मानवाला पशुच्या श्रेणीतून बाहेर काढून सभ्य, सुसंस्कृत करण्यासाठी दक्ष प्रजापतीने नियमावली तयार केली. ज्या प्रमाणे मनुस्मृती मध्ये सामाजिक हितासाठी कायदे , नियम सांगितले आहेत त्याचप्रमाणे दक्षाने सुद्धा सामाजिक हितार्थ नियम बनवले.
"दक्ष " या नाव प्रमाणेच तो प्रजेच्या हितासाठी दक्ष आणि सक्षम होता.
दोन भिन्न पण परस्पर पूरक अश्या विचारसरणी मधला विरोध शिव आणि दक्षाच्या बाबतीत घडतो.
दक्ष राजा होता. त्याला अनेक मुले आणि मुली होत्या. ( मुलींच्या संख्यांमध्ये मतभेद आहेत). सती आणि शिवाच्या मिलनाला त्याचा विरोध याच विचारसरणीच्या भिन्नतेमुळे झाला असे वाटते. धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही पण विवाह होण्यापूर्वीचा शिव हा तथाकथित सामाजिक सभ्यतेच्या रिंगणाला छेद देणारा असा, गृहस्थाश्रमाचा आधार असलेल्या माया,मोह, ममत्व, सौम्यत्व, प्रजोत्पत्तीची इच्छा या भावना नसलेला असा वैरागी, विचित्र वेशभूषा करणारा म्हणून प्रसिद्ध होता. न्यायनीती यांचे पालन करणारा दक्ष अश्या विरक्त व्यक्तीसोबत आपल्या राजसी, लाडाकोडात वाढलेल्या कन्येचा विवाह कसा काय लावून देणार ?
इथे एक सामान्य पिता मला दक्षामध्ये लपलेला दिसतो. अहंकारी जरी असला तरी आपल्या कन्येला काही त्रास होऊ नये म्हणून तिला जपणारा पालनकर्ता दिसतो. मुलीला "चांगले " स्थळ मिळावे म्हणून जोडे झिजवणारा बाप आजही दिसतो. दक्षसुद्धा तेच करत होता.
वर उल्लेखित प्रसंगात दक्ष सतीला वाचवण्यासाठी जेव्हा आपल्या शक्ती तिला देऊन देण्यासाठी तयारी करतो तेव्हा ब्रह्म सुद्धा त्याला अडवतांना म्हणतात कि या शक्ती तुला समाजाच्या हितासाठी दिलेल्या आहेत. तू त्यांचा वापर स्वार्थासाठी का करतोस ? " तेव्हा दक्ष म्हणतो कि माझी कन्या हि सुद्धा या समाजाचाच एक अंश आहे. एक प्रजापती म्हणून आणि पिता म्हणून मी तिला माझ्या शक्ती दिल्या तर त्यात काय चूक ? मी प्रजापती नाही राहिलो तरी चालेल, माझ्या जागी दुसरा प्रजापती निर्माण करा पण सतीचा पिता म्हणून मी तिचे रक्षण करणारच !
आपल्या मुलीवर निरतिशय प्रेम करणारा एक पिताच एवढा मोठा त्याग करू शकतो. आपल्या पदाचा अहंकार असता तर त्याने असे केले असते का ?
चंद्र , रोहिणी आणि इतर २६ दक्षकन्या यांच्या वेळी हाच दक्ष एक कठोर शासक आणि पिता या दुहेरी भूमिकेत दिसतो. आपल्या इतर मुलींवर अन्याय झालेला बघून, चंद्राला ; प्रत्यक्ष आपल्या जावयालाच शिक्षा देण्याची धमक दाखवतो.
चंद्राने जरी दक्षाच्या २७ मुलींसोबत विवाह केला तरी तो फक्त रोहिणी सोबतच रममाण झालेला होता. अन्य बायकांकडे तो लक्षच देत नव्हता. जेव्हा त्या मुलींनी पित्याकडे तक्रार केली तेव्हा दक्षाने चंद्राला समजावले. पण चंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी दक्ष चिडला. इथेही अनेक कथांमध्ये दक्षाला " खलनायक " म्हणून दाखवतात. पण गृहस्थाश्रमाच्या आणि विवाह संस्कारांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चंद्राला जर त्याने तसेच सोडून दिले असते तर समाजात एक चुकीचा पायंडा पडला असता. "प्रजापती" या नात्याने तसे करणे त्याला शक्य नव्हते. एकदा लग्न लावून दिले कि झाले मग तू मुलीला कसेही वागव, मला त्यात काही बोलण्याचा अधिकार नाही असे दक्ष म्हणत नाही. मुलगी परक्याचे धन असल्या भंपक कल्पना दक्ष बाळगत नाही. इथे तो न्याय करतो आहे ते नवऱ्याने अन्याय करून, उपेक्षित करून, " टाकून " दिल्या सारख्या " पत्नी " च्या बाजूने. पण मूळ कथा सांगतांना ,शिवाचे महत्व अधोरेखित करता करता चंद्राचा अपराध बाजूलाच पडतो. प्रत्यक्ष महादेव सुद्धा चंद्राला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावीच लागेल असे सांगून, शरण आला म्हणून त्याला डोक्यावर धारण करून शापाची तीव्रता कमी करण्यासाठी १५ दिवस क्षय होऊन १५ दिवस वृद्धी होईल असा उशाप देतात.
मला इथे अनायासच राजा जनकाची आठवण आली. सीतेचा त्याग केल्यानंतर ना सीता वापस आपल्या माहेरी गेली ना तिने आत्मत्याग केला.
उत्तर रामचरितमध्ये कौसल्या नेहमी चिंतेत दाखवली आहे कि सीतेवरच्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी जनक अयोध्येवर आक्रमण करेल का. पण असे काही घडत नाही. जनकाने तिला शोधण्याचा किंवा रामाला जाब विचारण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पण तरी कथा पुराणांमध्ये जनक " आदर्श " राजा म्हणून ख्याती पावला. आणि मुलीवरच्या अन्यायाविरुद्ध बोलणारा दक्ष मात्र " रागीट, अहंकारी राजा" म्हणून बदनाम झाला.
काही लेखक दक्ष प्रजापती नियमबद्ध, प्रतिगामी लोकांचे प्रतीक म्हणून तर शिव हा बंधन झुगारून नवीन मार्ग निर्माण करण्याऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून दाखवतात.पण असे असले तरी एक विसरतो कि शिवाने सुद्धा प्रजापती चे महत्व मान्य केले आहेच. मनुष्याच्या मूळ प्रवृत्तीला नियम झुगारून मनस्वी जगणे जास्त आकर्षक वाटते. पण व्यक्ती आणि समष्टी या दोहोंपैकी सगळ्याच धर्मानी समष्टी जास्त महत्वाची मानली आहे. मनुष्यच काय तर झुंडीत राहणारे इतर प्राणी सुद्धा आपल्या कळपाचे नियम पाळतात. प्रमुख प्राणी कळपाचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी स्वतःचे प्राण सुद्धा देतो.
दक्षाचा अहंकार त्याच्या नाशाचे कारण ठरला. पण समाजाच्या कल्याणासाठी त्याला पुन्हा जीवन देणे अपरिहार्य होते. म्हणूनच दक्षाचा शिरच्छेद केल्यानंतर सर्व देवांनी महादेवाला विनंती केली आणि म्हणूनच शिवाने बकऱ्याचे शीर लावून दक्ष पुनर्जीवित केला.
आजही कुठल्याही धार्मिक विधी मध्ये "प्रजापती " ला मान आहे. त्याचा हविर्भाग अनिवार्य आहे. कारण अहंकार विहीन, प्रेमळ तरी न्यायी अश्या " प्रजापती" चे संरक्षण व्यक्ती आणि समाज सगळ्यांनाच हवे असते.
शेवटी कठोर असले तरी " वडील " ते "वडील" च असतात. त्यांची माया दिसत नसली तरी त्या मायेची उब सदैव आपल्या भोवती असते. प्रजापती दक्ष मला त्याच प्रेमळ बापा सारखा वाटतो.

-पूर्णिमा देशमुख पुरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा