नाण्याची दुसरी बाजू
मी आणि माझी ताई लहान असल्यापासून आई,बाबा आणि आजोबांसोबत अनेक विषयांवर चर्चा,वाद,विवाद करायचो. अनेक वेळा आई आमच्या मुद्द्याच्या विरुद्ध मुद्दा मांडायची. खूपदा तिचे स्वतःचे मत आमच्या सारखेच असून सुद्धा ! जेव्हा आम्ही याबद्दल तिला विचारायचो,तिचे एकच वाक्य असायचे. " तुम्हाला दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करण्याची सवय व्हावी म्हणून असे करते. वादे वादे तत्व जायते बोध: !
त्या अनेक चर्चा आणि वाद यामधून आम्ही घडत गेलो, स्वतःने विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाच्या भल्याबुऱ्याची जबाबदारी घेण्याची सवय लागली. वाचनाने विविध विषय समजू लागले. घरी वेगवेगळ्या केसेस पाहणारे तीनवकील लोक आणि त्यांचे असंख्य प्रकारचे पक्षकार, वटवृक्षाप्रमाणे विस्तृत कुटंब, वैद्यकीय व्यवसायात बघायला मिळालेले रुग्ण आणि आजूबाजूला दिसणारे लोक यांचे अवलोकन करण्याची संधी मिळाली.
माझे हे लिखाण नाण्याची दुसरी बाजू बघण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत तशीच का वागली हे किंवा काही रूढी,समज तसेच का झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. कुणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही. धर्मावर भाष्य नाही करायचे. ( तेव्हढी पात्रता नाही माझी!). सनातन धर्म महान आहे. त्यातले सूक्ष्मातिसूक्ष्म तत्व समजून घेणे कठीण आहे. रामायण महाभारत यासारखे ग्रंथ हे प्रत्येक वेळी नवीन, वेगळेच काही तरी सांगून जातात. त्याचमुळे त्यांची अनेक संस्करणे झालेली आहेत.कितीतरी कथा, उपकथा आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत.अनेक विद्वानांनी महाभारत त्यांना जसे दिसले, आकलन झाले तसे सांगितले आहेत. अनेक मतमतांतरे आहेत. सगळेच काही माहिती नाही.कदाचित त्याचमुळे पुढेमागे आत्ताचा दृष्टिकोन बदलू पण शकतो.
हे लिखाण माझ्या आई बाबा आणि आजोबांना अर्पण करते !

- पूर्णिमा देशमुख पुरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा