विवादात अडकलेले कुरु राजे
Law of Primogeniture म्हणजेच ज्येष्ठ पुत्राला संपत्तीचा अधिकार हा जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये समाज आणि धर्ममान्य आहे. भारतातही १९५० पर्यंत हा कायदा अबाधित होता.पण असे असले तरी आपल्या प्राचीन स्मृती आणि धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विवाह आणि विवाहबाह्य संबंध आणि त्यातून उत्पन्न संतती आणि त्यांचे वारसा हक्क या बद्दल इतके सूक्ष्म आणि व्यावहारिक विचारमंथन केलेले आहे कि आपण थक्क होतो. मनुस्मृतीमध्ये जवळपास १२ प्रकारचे पुत्र सांगितले आहे. त्यात औरस आणि अनौरस असे दोन्ही प्रकार आहेत. ज्येष्ठ पुत्र नसल्यास वारसा हक्क कुणाला याबद्दल स्पष्ट निर्देष दिलेले आहेत. अगदी पुत्री आणि पुत्रीची संतती यांच्याबद्दल सुद्धा सांगितले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये राजेशाही म्हणजे हुकूमशाही अशी संकल्पना कधीच नव्हती. उलट राजा हा प्रजेचा पिता,पती आणि सेवक आहे असेच सर्वत्र मान्य होते. धर्माने सुद्धा हेच सांगितले आहे. राजा कोण बनेल या बाबत राजा, त्याचे मंत्रीगण आणि प्रजा या तिन्हीमध्ये एकवाक्यता असायला हवी असेच अभिप्रेत होते. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म म्हणतात कि " जो राजा उत्तम शासन करत नाही, ज्याचे मंत्रीगण दुराचारी आहेत अश्यांना प्रजा दंड देते आणि त्याच्या कुळाचा नाश करते." या वरून राजा आणि प्रजेचे अधिकार समजून येतात.
वारसाहक्काचे नियम राज्यपदाच्या बाबतीत देखील सारखेच आहेत. साधारणतः राजाचा ज्येष्ठ मुलगाच राजा होत असे. पण या नियमाला अपवाद ठरलेले,विवादाच्या भोवऱ्यात अडकलेले अनेक राजे कुरुकुलात होऊन गेले. कौरव आणि पांडव यांचे राज्याधिकारासाठी झालेले युद्ध तर सर्वांनाच माहिती आहे. बाकीचे कोण होते याबद्दल लिहावेसे वाटले.
कुरुवंशातला भरत हा दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र. महाभारतामधली शकुंतला हि कालिदासाच्या नायिकेपेक्षा वेगळी आहे.ती व्यवहारी आणि महत्वाकांक्षी आहे.तिने राजाकडून गंधर्वविवाहापूर्वीच वचन घेतले कि तिचा मुलगाच राजा बनेल. महाभारतामध्ये आणि इतरत्र सुद्धा शकुन्तलेपूर्वी दुष्यन्तचे अन्य विवाह झालेले होते का आणि त्यातून पुत्र झाले होते का याबाबत काही सांगितलेले नाही. पण ज्या अर्थी राजा दुष्यन्त दोघांनाही नाकारतो त्या अर्थी असे वाटते कि कदाचित त्याचे आधीच पुत्र होते आणि म्हणून विद्रोह होऊ नये म्हणून तो सोयीस्करपणे पितृत्व नाकारतो.
कारण काही असो, शकुंतला भर सभेत धमकी देते कि जर तिच्या मुलाला राजा केले नाही तर ती येनकेन प्रकारेण तिच्या मुलाला राजा करूनच दाखवेल. या ठिकाणी दोन मते आहेत. काहींच्या मते तिची हि धमकी ऐकून मंत्रीगण संभाव्य धोका जाणवून राजाला तिचे म्हणणे ऐकण्यास भाग पाडतात. आणि अन्य मते आकाशवाणी होते कि शकुंतला जे म्हणते आहे ते सत्य आहे आणि भरतालाच राजा करावे.
भरत राजा झाला. त्याने चहुदिशेने राज्य विस्तारले आणि आर्यावर्त " भारतवर्ष " नावाने ओळखल्या जाऊ लागला. जेव्हा भरताचा उत्तराधिकारी ठरवण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा एकदा विवाद उत्पन्न झाला. भरताच्या तीन राण्या होत्या आणि तिघींना तीन असे त्याचे एकूण ९ पुत्र होते. पण त्यातूनही ज्येष्ठ पुत्र तर सोडाच अन्य आठही पुत्रांमध्ये राजा होण्याचे गुण नव्हते. भरत काळजीत पडला. एव्हढे मोठे साम्राज्य जर अयोग्य व्यक्तीच्या हाती दिले तर भरताकडून अधर्म घडेल, राज्य आणि प्रजेवर अन्याय होईल. काय करावे या विचारात तो विमनस्कपणे फिरत असता त्याला ऋषी भारद्वाजचा मुलगा " भूमन्यू" दिसला. तो अत्यंत पराक्रमी आणि बुद्धिमान तर होताच त्याचसोबत तो न्यायी आणि धर्मनुचारी होता. भरताने जेव्हा आपल्या नऊही मुलांना वगळून भूमन्यूला राजा म्हणून निवड केल्याचे सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पण त्याचे मंत्रीगण आणि प्रजा दोघांनीही त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवला. भरताच्या पुत्रांनी विरोध केला नाही. कदाचित त्यांच्यात तेवढी धमक नसेल किंवा धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुपुत्राचा वारसा हक्क त्यांना माहिती असल्यामुळे ते काही बोलले नाही असे असू शकते.
भूमन्यू नंतर काही पिढ्या गेल्या आणि पुन्हा विवाद निर्माण झाला.
राजा प्रतिपचे तीन पुत्र होते. मोठा देवापि, मधला बाल्हिक आणि लहाना शांतनू. प्रतिप जेव्हा संन्यास घेण्यास सिद्ध झाला तेव्हा त्याने देवापिला राजपद देऊ केले. उत्तम राजा बनण्याचे सर्व गुण त्यात होतेच शिवाय तो प्रजेचा अत्यंत लाडका होता. पण खुद्द देवापिनेच राजा बनण्यास नकार दिला. का ?
कारण त्याला दुर्धर असा कुष्ठरोग झाला होता आणि त्यामुळे त्याचा एक पाय अधू होत चालला होता. त्याच्या मते असा रोग असलेला राजा राज्य आणि प्रजेचे रक्षण करण्यास अक्षम असतो. आणि म्हणून स्वतःच राजत्याग करून तो जंगलात तपसाधना करण्यास चालला गेला.
ज्येष्ठ पुत्रानंतर प्रतिपने बाल्हीकला राजपद स्वीकारण्यास सांगितले. परंतु बाल्हिकला पूर्वीच मातेकडून राज्य ( आत्ताच बाल्ख प्रदेश) मिळालेले होते. त्यामुळे तो तिथेच स्थायिक होता आणि त्याने दुसरे राज्य स्वीकारण्यास नकार दिला. सरतेशेवटी लहाना शांतनू राजा झाला. अर्थात तो सुद्धा राजा बनण्यास योग्य होताच. त्यामुळे असे वाटले कि आता तरी काही त्रास होणार नाही. पण तसे घडले नाही.
शांतनू राजा झाल्यानंतर सलग १२ वर्ष तीव्र दुष्काळ पडला. प्रजेमध्ये असंतोष निर्माण झाला. प्रजेचे म्हणणे पडले कि राजा जरी चांगला होता तरी ज्येष्ठ असलेल्या देवापिला राज्य न दिल्यामुळे देवांचा कोप झालेला होता आणि म्हणूनच राज्यावर अशी संकटे येत होती. जेव्हा शांतनूच्या कानावर हि बातमी गेली तेव्हा तो ताबडतोब देवापिला आणण्यासाठी जंगलात गेला. देवापिला सर्व वृत्तांत सांगून त्याच्या हक्काचे राज्य घेण्यासाठी गळ घातली. देवापिने पुनः नकार दिला. परंतु प्रजेच्या कल्याणासाठी आणि देवांचा कोप शांत करण्यासाठी त्याने यज्ञ केला. देव प्रसन्न झाले आणि पर्जन्यवृष्टी झाली.
लहान असलेल्या शांतनूचा मोठा मुलगा असलेल्या देवव्रताला(भीष्म) मात्र राजपद त्यागावे लागले. शकुंतलेप्रमाणेच महत्वाकांक्षी असलेल्या सत्यवतीने तिच्या मुलासाठी राजपद राखून ठेवले. पुन्हा एकदा ज्येष्ठत्वाला डावलले गेले.
ज्या मुलासाठी सत्यवतीने भीष्माचे जीवन दुष्कर केले तीच मुले वंशवृद्धी करण्यास असमर्थ ठरली. मोठा चित्रांगद अकाली मृत्यू पावला. आणि पुन्हा लहान असलेला विचित्रवीर्य राजा बनला. नावाप्रमाणेच त्याच्यात दोष असल्यामुळे शेवटी राज्याचा उत्तराधिकारी निर्माण करण्यासाठी सत्यवतीने पहिले साहजिकच भीष्माला साकडे घातले. पण त्याने ठामपणे नाही म्हंटले. त्यानंतर कुरुंच्या "बाल्हिक" शाखेकडे विचारणा केली. पण तिथूनही नकार आला. शेवटी सत्यवतीला आपल्या "कानिन " पुत्राची( व्यास ऋषी) मदत घ्यावी लागली. शास्त्र संमत नियोग पद्धतीने धृतराष्ट्र आणि पांडू जन्माला आले आणि त्यांच्यासोबतच नवीन विवादहि जन्मला. ज्येष्ठ असा धृतराष्ट्र अंध होता. त्यामुळे राजमाता सत्यवतीनेच कनिष्ठ अश्या पांडूला राजा केले. भीष्माला आणि मंत्रिगणाला मौन रहावे लागले.
इथे एक लक्षात घ्यावे कि आत्तापर्यंत ज्या ज्येष्ठांनी राजपद नाकारले ते एकतर स्वतःहूनच किंवा खुद्द राजानेच त्यांचा अधिकार डावलला. पण धृतराष्ट्राचे तसे नव्हते. त्याला राजपद हवेच होते. ती त्याची एकमेव महत्वाकांक्षा होती. ज्येष्ठत्वाच्या नात्याने अधिकार होता. त्याला हा अन्याय वाटला. पण राजमाता,मंत्रीगण आणि प्रजा यांच्या विरुद्ध त्याला काही करता आले नाही. पांडूच्या मृत्यूनंतर जरी त्याला राजसिंहासनावर बसवले तरी पहिले झालेला अन्याय आणि त्यावेळी ज्यांनी मौन ठेवले त्यांच्याबद्दल त्याच्या मनात जी अढी पक्की झाली ती कायमसाठी. त्या अढीमुळेच पुढच्या पिढीत संघर्षाची बीजे रोपल्या गेली.
विचित्रवीर्याप्रमाणेच पांडू सुद्धा प्रजोत्पादनासाठी अक्षम होता. पुन्हा एकदा नियोग पद्धतीने कुंती आणि माद्रीने पुत्रांना जन्म दिला. पांडव हस्तिनापुरात आले आणि पुन्हा एकदा उत्तराधिकारी कोण ह्या प्रश्नाने आ वासला.
कौरवांचा पक्ष होता कि ज्येष्ठ असल्यामुळे धृतराष्ट्राचा राजपदावर अधिकार तर होताच होता. आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र म्हणून साहजिकच दुर्योधन हा उत्तराधिकारी होता. बरे, त्याच्या नावाला विदुर सोडता कोणीच विरोध करत नव्हते. मंत्री आणि प्रजा यांच्यात तो प्रिय होता आणि उत्तम राजाचे गुण त्याच्यात देखील होतेच. शिवाय पांडव हे नियोग पद्धतीने झालेले होते. कौरव औरस पुत्र होते. वारसा हक्कासाठी कधीही औरस पुत्राचा सर्वप्रथम विचार होतो. त्यामुळे सुद्धा राजा दुर्योधनानेच व्हावे असा आग्रह होता.
पांडवांचा पक्ष होता कि पांडूला राज्याभिषेक झालेला होता. धृतराष्ट्र हा त्याचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत होता. त्यामुळे त्याच्या मुलांनी उत्तराधिकारी होण्याचा प्रश्नच चुकीचा होता. पांडुराजाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून युधिष्ठीरच राजा होणे योग्य होते.
दोन्ही पक्ष आपापल्या बाजूने योग्य असल्यामुळेच निर्णय करणे बिकट होते. शेवटी धृतराष्ट्राने राज्याचे विभाजन केले. पण संघर्ष कायम राहिला. भीषण असे युद्ध घडून आले. संपूर्ण कुरुकुलच नष्ट झाले. उरले फक्त पाच पांडव आणि त्यांचा एकमेव वारस - परीक्षित.
टीप :- ( जिज्ञासूंनी brief history of law of inheritance in Hindu religion वाचावे.)
_ सौ. पूर्णिमा देशमुख पुरेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा