शिष्टाचार, चालीरीती , व्यवहार आणि सोय
" सिंहासनी श्रीराघव बसता , "वामांगी " तू बसशील सीता,
जरा गर्विता ; जरा लज्जिता, राजभूषणा भूषविल हि,कमनीय तंव आकृती. "
ग.दि.मा च्या गीतरामायणातल्या एका गीतातली ओळ ऐकली आणि शिष्टचार, चालीरीती, तथाकथित संस्कारी वागणे यांचा दुसऱ्या बाजूने विचार करावासा वाटला.
खरेतर आपल्या धर्माने पत्नीला "वामांगी " असे संबोधून तिला राजरोसपणे पतीच्या बाजूला बसण्याचा मान आणि अधिकार दिलेला आहे. पूजेच्या वेळी पत्नी नवऱ्याच्या हाताला हात लावून हा अधिकार बजावते. पण तीच पत्नी जर इतर वेळी मोठ्यांच्या उपस्थितीत नवऱ्याचा बाजूला बसली तर कोण गहजब होतो! कितीतरी घरांमध्ये तर अजूनही नवरा,सासरा आणि इतर पुरुष नातेवाईकांच्या बाजूने बसणे निषिद्ध मानल्या जाते. पुरुषांच्या आधी जेवणे असंस्कारी समजल्या जाते. जेवण तर दूरचीच गोष्ट , साधे वर्तमानपत्र पहिले पुरुषानेच वाचले पाहिजे असे विचित्र नियम असतात.
अश्यावेळी नोकरी करणाऱ्या , आजार असलेल्या स्त्रियांचे खूप हाल होतात. तसेही आजकाल पंचविशी पासूनच काही ना काही शारीरिक त्रास असतात, त्यात लग्नानंतर या असल्या चालीरीतींमुळे अजून भर पडते.
माझ्या माहितीतल्या एका finance कंपनी मध्ये काम करणाऱ्या मुलीवर अशीच कुचंबणा होऊन वरिष्ठांसमोर मान खाली घालण्याची वेळ आली. कारण काय तर आदल्या दिवशी रात्री जाहीर केलेले कर सवलतींचे बदलेले नियम तिला सकाळी पेपर न वाचल्यामुळे माहितीच नव्हते. आणि तेव्हा इंटरनेट नव्हता. तिचे पुरुष सहकारी एकमेकांना कोपरखळ्या मारीत तिची टिंगल करत होते आणि तिच्या सोबतच्या इतर स्त्रिया आपल्यावर हि वेळ येऊ नये म्हणून काय करावे लागेल या चिंतेत पडल्या.
बरे या चालीरीती फक्त स्त्रियांसाठीच त्रासदायक नाहीत तर पुरुषांसाठी सुद्धा तापदायक ठरतात. काही प्रसंग उदाहरणार्थ देते.
प्रसंग १ - नवरा , बायको आणि ३ पाहुणे कार मधून जाणार होते. २-३ तासांचा प्रवास होता.त्यातल्या ३ बायका स्थूल आणि पुरुष रोड होते.पुरुष पाहुणा स्वतःचे महत्व दाखवण्यासाठी आधीच समोरच्या सीटवर बसून गेला होता.आपला संस्कार दाखवण्यासाठी बायको आणि अन्य दोघी मागे अतिशय दाटीवाटीने बसल्या. प्रवास संपेपर्यंत तिघींपैकी कुणाचा हात आखडून गेला, कुणाचा पाय ! नवऱ्याला त्यांची गैरसोय दिसत होती पण बोलणार कसे ?
प्रसंग २ - नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतांनाच सूनबाईला डॉक्टर कडे नेण्याची वेळ आली. सासूबाई स्वतःच आजारी. आता ऑटो मध्ये सुनबाई सासऱ्याच्या बाजूला एकाच सीट वर कश्या बसणार या चर्चेतच १-२ तास वेळ गेला. शेवटी शेजारच्या काकू सोबत आल्या,त्या मध्ये बसल्या आणि पेच सोडवला.
प्रसंग ३ - मी नवऱ्याच्याच बाजूला बसणार या हट्टापायी बायको समोरच्या सीटवर बसल्यामुळे , उंच असलेले मामेसासरेबुवा बिचारे पाय आखडून मागच्या सीटवर बसले.
शिष्टाचार, संस्कार यापायी सोयीचा बट्ट्याबोळ वाजला. भारतीय असो किंवा पाश्च्यात्य शिष्टाचार असो दुसऱ्याला त्रासदायक होणारे, कुणाची गैरसोय करणाऱ्या रीती पाळण्यात कुठली " सभ्यता " दिसून पडते ?
पूर्णिमा देशमुख पुरेकर -

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा