सण , उत्सव, कुलाचार आणि डे
हिंदी सिनेमा मधला St. Valentine's Day पडद्यावरून उतरून घराघरांमध्ये शिरला आणि तथाकथित हिंदू धर्म-संस्कृती रक्षकांची झोपच उडाली. त्यात भर म्हणजे Mother's Day, Father's Day , Son's Day ,Daughter's Day या सारखे आधुनिक festival साजरे करणे सुरु झाले. भारतीय सण, उत्सव आणि परंपरा यांना आता कोणी वाली नाही, आता या उच्च चालीरीती बंदच पडतील आणि धर्म बुडेल अशी ओरड सुरु झाली.
भारतीय तरुणाईने आपल्या परंपरांकडे पाठ वळवली का ? पाश्च्यात्य सणांना अंगिकारायला सुरुवात का केली ? आणि असे असेल तर का याबद्दल विचार करणे आवश्यक वाटते. दुसऱ्या बाजूने विचार करावासा वाटतो.
Day साजरे करणारे फक्त दारू मांसमटन खाण्यासाठी , स्वैराचार करण्यासाठी या सगळ्यांकडे आकर्षित झालेत आणि उपास तापास , नियम पाळणे त्यांना नको आहे, असा जो आरोप होतो तो काही खरा असला तरी माझ्या पाह्ण्यातले असे अनेक लोक आहेत जे अभक्ष्य भक्षण करत नाहीत , डे साजरे करत नाहीत पण तरी सणवारांबद्दल त्यांच्या मनात अनास्था निर्माण झालेली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे जे सण,उत्सव सध्या प्रचलित आहेत ते वेदकाळात उल्लेखित नाहीत. वेदांमध्ये वरुण ,इंद्र आणि इतर काही देवांची पूजा करणे,यज्ञ याग आणि बलि देऊन नैवेद्य अर्पण करणे एव्हढेच वर्णन आहेत.
जे सणवार , परंपरा आपण साजरे करतो ते काही विशिष्ट शुभ,अशुभ घटना घडल्या आणि त्या नंतर प्रथा म्हणून समाजमान्य झाल्या. उदा. देवीने असुरांचा वध केल्यानंतर देवीचे नवरात्र, रामराज्याभिषेकानंतर दसरा, होलिका दहन, नरकासुर वधानंतर नरक चतुर्दशी , बली प्रतिपदा या दिवसांना महत्व प्राप्त झाले. जसे आजकाल जयंती आणि पुण्यतिथी यांना महत्व आलेले आहे तसेच. आपण सुद्धा "कारगिल दिवस" साजरा करायला लागलो आहेच ना ?
पूजेचे जे स्वरूप सध्या प्रचलित आहे ते पुराण काळानंतर आदि शंकराचार्य आणि समकालीन धर्मज्ञ यांच्या कार्यामुळे प्राप्त झाले. अनेक प्रकारच्या उपासना, दर्शन शास्त्र तत्व, मूर्तिपूजक, मूर्तिपूजा न मानणारे , आस्तिक , नास्तिक ,द्वैतवादी , अद्वैतवादी ,शैव,वैष्णव शाक्त , गणपती संप्रदाय , इतर संप्रदाय या सारख्या सगळ्यांना हिंदू धर्माने सामावून तर घेतलेच आहे पण त्यांच्या विचारांना,आचारांना मान्यता दिलेली आहे.
अनेक सण हे ऋतुबदल आणि त्या ऋतूमध्ये पाळावी लागणारी आहार विहार नियमावली आणि निसर्गाचा समतोल यांची सांगड घालणारे आहे. उदा. नागपंचमी. पावसाळ्याची सुरुवात होताच वाफवलेले पदार्थ खाणे, हलका,पचायला सोपा आहार हवा म्हणून अनेक घरांमध्ये या दिवशी वाफवलेले पदार्थ नैवेद्याला असतात. त्यातच शेतीप्रधान देशात सापाचे महत्व स्मरणात हवे यासाठी त्यांचा सन्मान केल्या जातो. पण फक्त एकच दिवस वाफवलेले पदार्थ कुरकुर करत देवाचे आहे म्हणून नाईलाजाने खाल्ल्या जातात. काही घरी तर पुरणावरणाचा , तळण केलेला, पचायला अतिशय जड असा स्वयंपाक असतो. त्या सणाचा उद्देश फोल ठरला. असे कितीतरी दाखले देता येतात.
पहिले शेतीप्रधान समाज व्यवस्था होती. पण आता तसे नाही राहिले. देशाची आर्थिक आणि सामाजिक घडी हि फक्त शेतीपुरतीच मर्यादित न राहता उद्योग,व्यवसाय,परकीय गुंतवणूक, ग्राहकपेठ या सारख्या अनेक घटकांवर अवलंवून असते. गावातला समाज सुद्धा बाराबलुतेदार यांच्या परिघाच्या बाहेर विस्तारल्या गेला आहे.
शहरात तर वेगळीच परिस्थिती आहे. नोकरी व्यवसाय आणि त्यामागे होणाऱ्या फरफटीमध्ये माणूस अडकला आहे. एकीकडे आधीच्या पिढीतल्या लोकांचा कुलाचार, परंपरा " जश्याच्या तश्श्याच " पाळायला हव्या हा अट्टाहास आणि दुसरीकडे नोकरी व्यवसायाचा धर्म या मध्ये आताचा माणूस त्रिशंकू सारखा लटकलेला आहे.त्यामागे त्या सणांचा राग नाही. तर त्या सणांची प्रासंगिकता, कालोचितता कुठेतरी कमी झालेली दिसून येते.वेळेचा अभाव हे कारण तर सगळ्यात मोठे आहेच. उदा.नवरात्रामध्ये अनेक घरी अखंड दीप प्रज्वलित ठेवतात. आता घरात इनमीन चार माणसे , नवरा बायको नोकरीसाठी आणि मुले शाळेत. असे असतांना त्या दिव्याची देखरेख कोण पाहणार ? हि परंपरा कशी पाळणार ? हा प्रश्न येतो. पूर्वी इलेक्ट्रिसिटी नव्हती. पण आता तसे नाही. नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवण्यासाठी इतके तेल वापरणे कितपत संयुक्तिक वाटते ?
आता तर इलेक्ट्रिसिटी सुद्धा गरज असेल तेव्हढीच वापरावी असे कानीकपाळी ओरडून सांगतात. इथे मी नम्रपणे एक सुचवू इच्छिते कि यज्ञ,होमहवन यामुळे वातावरण शुद्ध होते हे तर सिद्ध सत्य आहे. पण इतके दिवे लावण्याने काय साध्य होते ? देवळ्यांमध्ये नावाने दिवा दिल्या जातो. तिथे मोठ्यामोठ्या हॉल मध्ये दिवे लावतात. कितीतरी लिटर तेल वापरल्या जाते. त्या पेक्षा एकच दिवा सगळ्यांच्या नावाचा उच्चार करून लावला तर ?
दुसरे कारण म्हणजे प्रांतीय न राहता जागतिक झालेल्या खाद्यसंस्कृतीने लोकांची "सणावारी हाच नैवेद्य करायला हवा" हि मानसिकता बदलते आहे. आणि त्यात काही वावगे आहे असे नाही.आयुर्वेदानुसार जे ऋतुचर्येचे नियम आहेत त्यांचे पालन आणि तामसिक पदार्थ यांचा निषेध करायला हवा असे वाटते. मद्यपान आणि मांसाहार हा भारतात तरी करूच नये. त्याला माझा विरोधच आहे.
आत्ताची तरुणाई कुठल्याही गोष्टीमागचे "logic " काय आहे हे विचारते. ते लॉजिक सांगता यायला हवे.
आता Day बद्दल. भारतीय संस्कृतीने माता पिता आणि गुरु यांचा गौरव करायला सांगितलाच आहे. मग एक दिवस जर आपल्या आई वडिलांच्या आवडीचे करण्यात साजरा केला तर वाईट काय आहे ? मुलांचे कौतुक करण्यासाठी एक दिवस वेगळा ठेवला तर काय चूक ? गुढी पाडवा तर साजरा करायलाच हवा पण व्यवहारात जे calender आपण पाळतो आहे त्याचा पहिला दिवस तामसिक आहार विहार ना करता भारतीय संस्कृतीला साजेसा बदल करून साजरा करण्यात गैर काय ? राहता राहिला या सगळ्याला सुरुवात करणारा Valentine डे. ज्या संस्कृतीमध्ये वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा गौरविले आहे, रती - मदन यांना देवत्व दिलेले आहे तिथे नैतिक रित्या समाज मान्य पद्धतीने प्रेम प्रकट केले तर काय बिघडते ? कुठल्याही विकृतींना थारा द्यायचा नाही, ते चुकीचेच आहे. पण आपल्या धर्माने सगळ्या नात्यांमध्ये पतिपत्नीच्या नात्याला सर्वोच्च स्थान दिले आहे. पारंपरिक भारतीय पुरुष आई वडील आणि बहीणभावाबद्दल तर भरभरून प्रेम दाखवतो पण पत्नीबद्दल मात्र मौन पाळतो. पत्नी वर विनोद करण्यात पुढाकार घेतो. पण तिचा सन्मान,कौतुक करण्यात मात्र कुचराई करतो. प्रेमाचे विकृत आणि सामाजिक प्रदर्शन न करता तुम्ही तो दिवस साजरा केला तर काय वाईट ?
सण आणि उत्सव यांच्या ज्या काही परंपरा, कुलाचार कालबाह्य वाटत आहेत, त्यांना सोडून द्यायला हवे. लवचिक असलेल्या हिंदू धर्माने विचारमंथन करून कालानुरूप बदल करावा अशीच अपेक्षा आहे. तरच उत्सवातील "उत्साह " टिकून राहील.

-पूर्णिमा देशमुख पुरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा