एकतर्फी प्रेम - दैवी सौंदर्य, शापित विद्रुपता
गेल्या काही वर्षांपासून प्रेमाचा स्वीकार न केल्यामुळे ऍसिड टाकून विद्रुप करण्याच्या अमानुष कृत्यांची लक्षणीय वाढ झालेली आहे. एकतर्फी प्रेम हि संकल्पना काही नवीन नाही. पण "मुलीचा नकार" पचवण्याची ताकद कापुरुषांमध्ये अजूनही आलेली नाही. असले निंदनीय कृत्य करणारे खरेच प्रेम करत होते का ? ज्या प्रेमाला कथा पुराणांनी जगातले सर्वात उद्दात्त स्थान दिलेले आहे ते प्रेम असले अक्षम्य कृत्य करणे तर दूरच पण तस विचार सुद्धा करणार नाही.
राधा कृष्णाचे प्रेम एकतर्फी नव्हतेच. पण राधा विवाहित होती आणि सामाजिक नीतिनियमांच्या बंधनात अडकलेली असून सुद्धा तिचे प्रेम सोन्यासारखेच लखलखते राहिले. कृष्णाने वृंदावन सोडल्यानंतर कधीच तिची भेट घेतली नाही. तरी तिचे त्याच्या जीवनातले स्थान सर्वोच्चच राहिले.
मुलाने प्रेमाराधन केल्यानंतर ते स्वीकारणे हे अनेकदा मुलींसाठी क्रमप्राप्तच होते. असे असले तरी मुलीने "propose " करण्याचे प्रसंग सुद्धा पुराणात उल्लेखित आहेत. रुख्मिणी, हिडिंबा,उलुपी,चित्रांगदा,सावित्री या सारख्या स्त्रियांनी स्वतःहूनच पुढाकार घेतलेला आहे. भलेही त्यांचे प्रेम एकतर्फी होते तरीसुद्धा त्या काळातल्या सभ्य,आर्यत्वाच्या शिष्टाचाराप्रमाणे त्यांचा विवाह प्रस्ताव स्वीकारलेला आहे. एकतर्फी प्रेमाची हि उदाहरणे सुंदरच आहेत.
पण प्रेमभावनेचा स्वीकार न केल्यामुळे शाप देऊन अथवा अन्य शिक्षा देऊन त्या नकाराचा वचपा काढणे हे सुद्धा पुराणांमध्ये उल्लेखित आहेच. शूर्पणखेचे उदाहरण तर सगळ्यांनाच माहिती आहे. तिने पहिले रामाकडे आणि नंतर लक्ष्मणाकडे प्रेमयाचना केली पण त्यांनी नकार दिल्यावर ती चिडून त्यांच्यावर वार करण्यास येते आहे हे पाहताच रामलक्ष्मणानें तिचे नाक कान कापून टाकले. स्वरक्षणार्थ असे केले असे म्हणू शकतो. पण तरीसुद्धा हि एकप्रकारची शिक्षाच नव्हे का ? या अपमानाचा सूड घेण्यासाठीच तर रावणाने सीताहरण केले. शूर्पणखेला शिक्षा म्हणून दिलेली हि विद्रुपता कितपत योग्य वाटते ? त्या ऐवजी अन्य कुठला उपाय नव्हता का ?
दुसरे उदाहरण गणेश आणि तुलसी यांचे देते. इथे दोघांनीही एकमेकांना शाप दिलेला आहे. तुलसी हि धर्मध्वज राजाची कन्या होती. तपसाधनेच्या तेजाने झळझळणाऱ्या गणेशाला पाहून ती त्याच्या प्रेमात पडली. तिने त्याच्यासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण गणेशाने त्यास नम्रपणे नकार दिला. तिने पुन्हा पुन्हा त्याचे आज़र्व केले. पण गणेशाचा नकार ठाम होता. त्यामुळे चिडून तिने गणेशाला शाप दिला कि " तुला तुझ्या मनाविरुद्ध विवाह करावा लागेल." या शापाने क्रोधीत होऊन गणेशाने सुद्धा तिला शाप दिला " तू असुराची पत्नी होशील आणि त्या नंतर एक झुडपे बनून राहशील."
हे ऐकून तुलसीला पश्चाताप झाला. तिने गणेशाची क्षमा मागितली. त्यामुळे गणेशाने उशाप दिला कि विष्णू तुझा उद्धार करेल आणि तू तुळशीचे झाड होऊन पृथ्वीवर राहशील.तुझी पाने त्याला सगळ्यात जास्त प्रिय होतील . पण माझ्या पूजेत तुझी पाने निषिद्ध होतील. "
दैत्यगुरू शुक्राचार्यांनी मुलगी देवयानीचे तर संपूर्ण जीवनच प्रेमभंग आणि विश्वासघाताने काळोखून गेलेले आहे. संजीवनी विद्या मिळवण्यासाठी शिष्य बनून आलेल्या बृहस्पतीपुत्र कचावर देवयानी प्रेम करू लागली. कचाने तिला दूर लोटले नाही. फसवणूक करून विद्या प्राप्त करण्याच्या हेतूने आलेल्या कचाला जेव्हा दैत्यांनी मारून जाळून टाकले तेव्हा त्याची राख दारूत मिसळून शुक्राचार्यांनी पिण्यास लावली. मृत कचाला जिवंत करण्यासाठी देवयानीने आपल्या वडिलांना खूप विनंती केली, एव्हढेच नव्हे तर आजन्म अविवाहित राहण्याची धमकी दिली. शुक्राचार्यंनी मुलींच्या प्रेमापायी तिला संजीवनी मंत्र शिकवला. कचाला जिवंत करण्यासाठी त्यांनी मंत्र म्हणताच त्यांचेच पोट फाडून कच बाहेर आला. शुक्राचार्य गतप्राण पडले होते. कचाने देवयानीला संजीवनी मंत्र म्हणून त्यांना जिवंत करण्यास सांगितले.प्रेमभोळ्या देवयानीने तसे करताच कचाला तो मंत्र समजला. तो त्वरित तिथून निसटला. देवयानी स्तंभित झाली. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा तिने आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार करताच कपटी कच तिला नकार देत म्हणाला " तुझ्या पित्याच्या पोटातून मी बाहेर आलो याचा अर्थ मी त्यांचा मुलगा झालो. तू माझी बहीण झालीस. आपला विवाह शक्य नाही."
हा विश्वासघात आणि कपटीपणा तिच्यासाठी धक्कादायक होता. तिने त्याला शाप दिला " ज्या विद्येसाठी तू हे सगळे कपट कारस्थान केलेस आणि मला फसवले ती विद्या तू कायमची विसरून जाशील. " आणि याच शापामुळे देवांना कधीच संजीवनी विद्या मिळू शकली नाही.
यावर कचाने सुद्धा देवयानीला शाप दिला कि तुला इच्छित प्राप्त होऊन सुद्धा त्याचे सुख मिळणार नाही. म्हणजेच तू कधीच सुखी होणार नाहीस. आणि झालेही तसेच. ययातीने तिच्यासोबत विवाह केला तरी प्रेम मात्र शर्मिष्ठेवरच केले. तिच्या वाट्याला अवहेलनाच आली.
असे म्हणतात कि प्रेम हे खूपदा दुःखदायीच असते. सफल झाले तर ठीक नाहीतर प्रेमभंगाचे दुःख. आणि त्यातही एकतर्फी प्रेम होणे हेच मुळात एखाद्या शापा सारखे वाटते. आयुष्यच विद्रुप झाल्यासारखे वाटते. पण खरे प्रेम एकतर्फी असले तरीसुद्धा विद्रुपतेवर मात करून सौन्दर्य निर्माण करू शकते.
करण जोहरच्या ए दिल है मुश्किल मधले एक वाक्य सार्थ आहे
" एकतर्फा प्यार कि ताकत हि कुछ और है, दुसरे रीश्तोकी तरह ये मोहोब्बत दो लोगोमें नहीं बँटती ; बस मेरे हक में रहती है "
प्रेमाचे सौंदर्य असेच असावे, नाही का ?
- पूर्णिमा देशमुख पुरेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा