माझा संसार माझा कधी होणार ? - उर्मिलेची उद्विग्नता
"नाथ, मी सुद्धा तुमच्या सोबत येते. सीताताई सोबत मला पण येऊ द्या." उर्मिला विनवीत होती.
"नाही उर्मिला.तू जर माझ्या सोबत आलीस तर मी दादा वहिनींकडे पूर्ण लक्ष देऊ शकणार नाही.त्यांचे संरक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. तू इथेच राहा. मातापित्यांचा सांभाळ कर. ते तुझे कर्तव्य आहे.राजमहालातली सगळी जबाबदारी तुझीच आहे. इथे तू सुरक्षित राहशील.मला तुझी काही चिंता राहणार नाही आणि मी बिनघोरपणे माझे विहितकार्य पार पडू शकेन.येतो मी," निरोप घेऊन,मागे वळून न बघता लक्ष्मण चालला गेला.
"नाथ,वनवासात माझ्या सोबत असण्याने तुमच्या कर्तव्यात अडथळा कसा काय येईल ? एकमेकांना जन्मभर साथ देण्याचे जे वचन सप्तपदी वेळी घेतले होते ते का विसरता आहेत ? माझ्या प्रति तुमचे काहीच कर्तव्य नाही का ? तुमच्या विना मी इथे एकटी पडेल त्याचे काय ? "
उर्मिलेचे प्रश्न मनातल्या मनातच राहिले.लग्न समयी जेमतेम नऊ दहा वर्षांची असलेली उर्मिला आता तारुण्यावस्थेत प्रवेशिली होती. ऐन उमेदीच्या काळात लग्न संसाराबद्दल प्रत्येक मुलीच्या ज्या काही अपेक्षा,
स्वप्न असतात त्या तिच्याही मनात होत्याच कि. त्या सगळ्या अपेक्षा लक्ष्मणाच्या वनवासात जाण्याने त्याच्याच पायदळी तुडवल्या गेल्या.
पतीआज्ञे प्रमाणे उर्मिला आपल्या कामाला लागली.राजा दशरथ म्हणजे तिचे सासरे, पुत्रवियोगाने हतबल झाले होते. तीन सासवा होत्या.पण त्यासुद्धा स्वतःच्याच दुःखात चूर होत्या.पट्टराणी कौसल्या मुलगासुनेच्या जाण्याने कोसळली होती.सुमित्रेची तीच स्थिती होती.तर कैकयी आपल्या मुलाच्या राज्याभिषेकाचे स्वप्न पाहण्यात गर्क होती. त्यावेळी राजमहालात ज्येष्ठ असणारे सर्वच किंकर्तव्यमूढ झालेले होते.भरत शत्रुघ्न आणि त्यांच्या बायका अयोध्येत वापस यायच्या होत्या. एक फक्त तीच होती जी कठीण परिस्थितीचे भान ठेवून ,पतिवियोगाचे दुःख मनाच्या तळ्यात खोल दाबून मोठ्यांचा आधार बनली.
राजकुमारी उर्मिलेला माहेरी आणि सासरी राजमहालातल्या आणि राजकारणातल्या सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडण्याचे शिक्षण मिळाले होते. त्यामुळे उर्मिलाने दोन्ही कर्तव्ये समर्थपणे पेलले. ती एक उत्तम व्यवस्थापक तर होतीच त्याशिवाय वनवासात जाण्यापूर्वी सीतेने तिला वर दिला होता कि ती एकाचवेळी तीन कामे करू शकेल. म्हणजेच ती "multi tasking expert " होती. पण त्याचसोबत उर्मिलेच्या बाबतीत एक वेगळीच कथा वाचण्यात आली.
वनवासातल्या पहिल्या रात्री रामसीता निद्राधीन झाले. लक्ष्मण "जागता" पहारा देत होता.तेव्हा निद्रादेवी तिथे आली. लक्ष्मणाने तिला नमन करून विनंती केली कि कृपा करून पुढची चौदा वर्ष तू माझ्याकडे येऊ नको. निद्रादेवी अवाक झाली."निसर्गाविरुद्ध असे कसे करता येईल ? माणूस झोपेशिवाय कसा काय राहू शकेल ? छे , हे शक्यच नाही. " ती म्हणाली. या वर थोडा वेळ विचार करून लक्ष्मण म्हणाला,"देवी,असे कर. तू माझ्या अर्धांगीकडे जा. चौदा वर्ष तू तिच्याचकडे रहा . म्हणजे माझे कर्तव्यही पार पडेल आणि निसर्गाविरुद्धही काही होणार नाही. त्याप्रमाणे निद्रादेवी उर्मिलेकडे गेली.असे म्हणतात कि उर्मिला चौदा वर्ष निद्रावस्थेतच राहिली. तिची हि निद्रा "उर्मिलानिद्रा" या नावाने प्रसिद्ध आहे.
याच संदर्भात असेही वाचले कि रावणपुत्र मेघनादाने इंद्राला तपाने प्रसन्न करून घेतले तेव्हा असा वर मागितला कि मला कोणीही मनुष्य मारू शकणार नाही. तेव्हा इंद्राने त्याला आपले अस्त्र देऊन वर दिला कि जो मनुष्य चौदा वर्ष झोपला नसेल तोच तुला मारू शकेल.मेघनाद हे ऐकून खुश झाला कारण चौदा वर्ष झोपेशिवाय कोणीच मर्त्य मनुष्य राहू शकत नाही.म्हणजेच मी अमर झालो. पण लक्ष्मण हाच एक तसा माणूस होता आणि त्याच्याच हातून मेघनाद मारल्या गेला.
असे जर असेल तर मग दशरथराजा जेव्हा शेवटची घटका मोजत होता तेव्हा उर्मिलानेच त्याला मांडी देऊन त्याच्या मुखी तुळशीपत्र ठेवले असे जे ऐकतो ते कसे काय झाले असेल?दोन्ही गोष्टींमध्ये सुसंगती लागत नाही. शिवाय एकाच वेळी ३-३ कामे करू शकण्याच्या वराचे काय ? थोडा विचार करता मला असे वाटते कि पती वनवासात गेल्यानंतर लक्ष्मण आणि उर्मिलाने आपल्या निसर्गसुलभ प्रवृत्तींना बांधून टाकले.संसारात असून सुद्धा वैराग्य धारण करून मनावर दगड ठेवला. वियोगानंतर माणूस भूक तहान ,झोप चैन सगळे गमावून बसतो.एक झापड मनावर आवरण करते.सगळे कर्तव्य यंत्रवत केल्या जातात. जिवंत आहे पण जगणे नाही अशी जी अवस्था होते तशीच उर्मिलेची अवस्था झाली असेल. इंग्लिश मध्ये त्याला "like a zombie " म्हणतात तसे.
१४ वर्ष coma मध्ये असल्या सारखी ती झोपली नसेल. तर एकाच वेळी ३ कामे करण्याचे कौशल्य वापरून ती राजमहालातल्या सगळ्या कर्तव्यांना पार पाडून लक्ष्मणाची "अर्धांगी" या नात्याने त्याच्या वाटणीची झोप घेत असेल. असा विचार जास्त संयुक्तिक वाटतो.
उर्मिला एक एक दिवस काढत होती. ती एकटी आणि एकाकी होती. मानसिक आणि शारीरिक एकाकीपणा ! त्यातच पुन्हा पतीच्या आयुष्यात आपले स्थान दुय्यमही नाही तर तिय्यम आहे याची प्रचंड वेदनादायी जाणीव छळत होतीच. पण ती निश्चल राहिली. रामराज्याभिषेकानंतर जे काही वर्ष तिला पती सहवास मिळाला तोच काय तिच्या आयुष्यातला सुखी काळ!
सीतेच्या त्यागानंतर पुन्हा तिला राजधर्म,कुळधर्म पालन करावे लागले. पण त्यात काही सुख होते का ? स्वतःच्याच बहिणीला घराबाहेर काढून टाकलेले पाहून पुन्हा हेच सिद्ध झाले कि कर्तव्यांचा सुद्धा अग्रक्रम असतो. आणि बायकोप्रतीचे कर्तव्य हे सगळ्यात शेवटच्या पायरीवर असते. उर्मिलेला याचा अनुभव तर आधीच आलेला होता. आपल्या बहिणीच्या नशिबी पुन्हा परित्यक्ता बनून राहण्याची वेळ आलेली तिला बघावी लागली. उत्तररामचरित्रात रामाने सीतेला सोडले त्याबद्दल कौसल्येच्या मनातल्या दुःखांची वर्णने आलेली आहेत.पण उर्मिलेचे दुःख मात्र यावेळी सुद्धा उपेक्षितच राहिले.
व.पु.काळे चे एक वाक्य आहे "' पुरुष लग्न का करतात ?त्यांना मोलकरीण ,स्वयंपाकीण,शय्यासोबती आणि आईवडिलांची,मुलांची जबाबदारी उचलणारी एक परिचारिका हवी असते.ती कमावतीही असली पाहिजे पण तिला लौकिक मात्र नको.एका स्त्री मध्ये त्यांना हे सगळे हवे असते."' किती खरे आहे हे वाक्य !
आजही कित्येक स्त्रिया नवरा कामानिमित्त दुसऱ्या गावी राहत असतांना सासूसासर्यांना सांभाळण्यासाठी सासरी राहतात. त्यातच मुलांचीही जबाबदारी असतेच. पुरुष बिनधास्त आपल्या करियरच्या मागे आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुठेही जायला मागेपुढे बघत नाही.लग्न करून माझ्या घरात आली ना मग आता माझ्या आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी असे म्हणून मोकळा होतो. फक्त पैसे पुरवून कर्तव्य पार पडत येते का ? एकीकडे सासूसासरे अजूनही घरसंसारावरची आपली पकड सोडायला तय्यार नसतात, इतके वर्ष आम्ही संसार केला, माझे घर,माझी भांडीकुंडी, हे माझे ते माझेच असे ऐकवत राहतात.जरा काही सुनेने आपल्या मनाने काही बदल केला कि लगेच तिच्या संस्कारांचा पंचनामा केला जातो.पण आपण कसेही वागलो तरी सुनेने आपले सगळे केलेच पाहिजे नव्हे केले तर काय मोठे केले हीच भावना अजूनही कायम आहे. आणि पुन्हा जर वेगळे राहत असतील किंवा वृद्धाश्रमात ठेवल्या गेले तर मात्र चांगले पांग फेडले असे म्हणत सुनेच्याच नावाने बोट मोडली जातात.
तिचा संसार तिचा स्वतःचा कधी होईल ? लग्नानंतर मुलाच्या आयुष्याच्या केंद्रभागी त्याची पत्नी असते हे शास्त्रवचन वास्तवात समाजमान्य कधी होईल ?
-पूर्णिमा देशमुख पुरेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा