नैतिकतेची दीक्षा आणि अनैतिकतेची शिक्षा मलाच का ? - अहिल्या आणि रेणुकेचा जाब
अहिल्येची आणि रेणुकेची गोष्ट तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. इंद्राने अहिल्येला कपट करून फसवले. गौतम ऋषीना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी इंद्र आणि अहिल्येला शाप दिला. इंद्राच्या शरीराला सहस्त्र छिद्रे पडली आणि अहिल्या शिळा बनली. राग शांत झाल्यानंतर गौतम ऋषीनी अहिल्येला उशाप दिला कि विष्णु जेव्हा राम अवतारात तिथे येतील तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने अहिल्या पुन्हा उध्दारीत होऊन जिवंत होईल.
परशुरामची माता आणि जमदग्नी ऋषीची पत्नी रेणुका ही सुद्धा अतिशय पवित्र आणि पतिव्रता होती. जमदग्नी ऋषी फार वयस्क होते. रेणुका त्यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान होती. एके दिवशी नदी काठी पाणी भरण्यासाठी गेलेली असता तिला तिथे काही गंधर्व जलक्रीडा करतांना दिसले. एकच क्षण ! एकाच क्षणासाठी तिच्या मनात त्या यौवनसंपन्न पुरुषी सौंदर्याची भूल पडली. तीसुद्धा मनातल्या मनातच. पण तो एकच क्षण तिच्या नाशाचे कारण ठरला.
जमदग्नी ऋषीनी एक एक करत आपल्या पाच पुत्रांना आपल्याच आईचे शीर धडावेगळे करण्याचे आदेश दिले. पण थोरल्या चारहि जणांनी मातेची हत्या करण्यास नकार दिला. फक्त परशुरामानी पितृआज्ञा प्रमाण मानून एकाच वाराने रेणुकेचे मस्तक धडावेगळे केले. आपला राग शांत झाल्यानंतर जमदग्नीना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. पण उघडपणे तसे कसे दाखवणार ? त्यांनी परशुरामांना २ वर मागण्यास सांगितले. परशुरामांनी आपल्या बंधूंना पुनर्जीवित करण्याचा आणि मातेचे शिर जीवित करण्याचा वर मागितला. रेणुकेचे फक्त शिर च पुनर्जीवित झाले. ती तिथेच स्थापित झाली. माहूरची रेणुका, "देवी " पदाला पोहोचली.भक्तांची सौम्य स्वरूपी माता बनली.
अहिल्या आणि रेणुकेच्या मनात आपल्याला हकनाक शिक्षा भोगावी लागली याबद्दल चीड निर्माण नसेल झाली का ? अहिल्येचे पावित्र्य इंद्राने भंग केले. त्याबद्दल तिला शिक्षा का झाली ? तिची काय चूक होती ?
रेणुकेच्या बाबतीत तिचा शिरच्छेद करावा असा तिचा अपराध होता का ? अपराधाच्या तीव्रतेप्रमाणे शिक्षा द्यावी हा नियम जमदग्नी का विसरले ?
अनेक संस्करणांमध्ये अहिल्या जाणून बुजून इंद्रासोबत विषयविलास करते असे आलेले आहे.तसे जरी असले तरी कित्येक पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत. त्यांना या अपराध बद्दल त्यांच्या बायकांनी शाप दिल्याचे ऐकले आहे का ? नाही ना ? पुरुषांनी असे वागले तर चालते पण स्त्रियांनी असे वागले तर तो महापराध ठरतो हा कुठला न्याय ?
रेणुकेने तर एकाच क्षणासाठी आणि ते सुद्धा मनातल्या मनातच ,समोर दिसणाऱ्या उत्कृष्ट पुरुषी देहाचे सौन्दर्य ग्रहण केले. देह प्राप्तीची कामना सुद्धा केली नाही. तरी तिचा शिरच्छेद करावा ?
विश्वामित्राच्या तपस्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवले. त्यांच्या संयोगातून एक मुलगी सुद्धा जन्मली. तो व्यभिचार नव्हता का ? विश्वामित्र सुद्धा तेव्हा महर्षी झालेले होते. त्यांची तपस्या भंग झाली हे ठीक पण त्यांचे महर्षिपद,त्यांचे पावित्र्य का नाही भंग झाले ?
का व्यभिचार , मग तो शरीराने असो व मनाने , पुरुषांनी केला तर चालतो, पण स्त्रियांनी त्याचा विचार सुद्धा करणे महा पाप ठरते ? हा पक्षपात का ? त्यातच अजून एक मेख आहे. लग्न संस्था ही सर्वार्थाने फक्त आणि फक्त वंशवृद्धी साठीच निर्माण केली गेली आहे. विवाहित स्त्री अथवा पुरुष जर काही कारणाने अपत्य निर्मितीसाठी सक्षम नसेल तर "नियोग " पद्धती चा अवलंब करू शकत होता. त्या बाबत तेव्हाचा समाज पुढारलेला होता. पण नियोग करण्याचे कारण नसतांना जर स्त्री ने संबंध ठेवले तर मात्र तो अपराध होता.
नुकतेच सुप्रीम कोर्टाने ४९७ कलम रद्द केले. " विवाहबाह्य संबंध " या अतिशय नाजूक विषयाशी हे कलम जुळले होते. त्यानुसार जर पतीच्या संमतीने पत्नीने परपुरुषासोबत शरीर संबंध ठेवले तर तो अपराध नव्हता. पण जर कुण्या पर पुरुषाने पतीच्या संमती शिवाय त्याच्या पत्नी सोबत शरीरसम्बन्ध ठेवले तर पती त्या पुरुषाच्या विरोधात तक्रार करू शकत होता. आणि त्या अपराधाबद्दल त्या परपुरुषाला ५ वर्षांची कैद अथवा दंड अथवा दोन्ही ची शिक्षा देण्यात येण्याचे प्रावधान होते.
अहिल्येच्या वेळी जर हे कलम असते तर तिला शिक्षा झालीच नसती. कारण या कलमानुसार फक्त पर पुरुषालाच शिक्षा होणार होती आणि ते सुद्धा त्या स्त्रीच्या पतीने तक्रार केली तरच. स्त्री तक्रार करू शकत नव्हती.
या कलमाविरुद्ध याचिका का झाल्या ? विरोधाचा पहिला मुद्दा हा होता कि तक्रार करण्याची मुभा फक्त पतीलाच होती हे पतीचा पत्नीवर मालकी हक्क असल्याचे सुचवत होता,पत्नी पुरुषाची संपत्ती असल्याचे दर्शवत होता जे भारतीय संविधानाने स्त्री आणि पुरुष समान असल्याचा जो अधिकार दिला आहे त्या विरोधात होते. दुसरा मुद्दा हा कि विवाहबाह्य संबंध ठेवण्यास प्रत्यक्ष त्या स्त्रीचीच संमती असली तरी पतीची संमती नसल्यामुळे तो अपराधच ठरत होता. पण त्याचवेळी पतीची संमती असतांना पत्नीच्या संमतीशिवाय परपुरुष संबंध ठेवत असेल तर तो अपराध ठरत नव्हता.
या दोन कारणांमुळे ४९७ कलम असंवैधानिक ठरवून रद्द केले. पुन्हा एकदा नैतिकता अनैतिकता व्यभिचार यावर चर्चा रंगल्या.
पण अहिल्या रेणुकेच्या वेळी ४९७ कलम नसतांनाही त्या बळीच्या बकऱ्या बनल्या. पुढे भलेही अहिल्या पंचकन्या पैकी एक झाली आणि रेणुका देवी बनली तरी मानवी देहात आणि मनात असलेल्या निसर्गसुलभ भावनांच्या प्रकटीकरणाचे नियम स्त्री साठी वेगळे आणि पुरुषासाठी वेगळेच राहिले आहेत हेच सिद्ध झाले. कायद्याने दिलेले अधिकार आणि प्रत्यक्ष समाजाची अश्या घटनांकडे बघण्याची दृष्टी हि स्त्रीविरोधीच राहिलेली आहे.
आज भलेही पुरुषाच्या विवाहबाह्य संबंधांना अपराध ठरवले आहे, कायदा तिच्या बाजूने आहे तरीही स्त्री च्या "sexual choice and rights " बद्दल आजचा तथाकथित प्रगत समाज उदासीनच आहे. नैसर्गिक भावनांबद्दल स्त्री आणि पुरुष असं भेद न करता दोघांनाही "मनुष्य" मानून एक समान धार्मिक आणि सामाजिक नियमावली कधी बनेल का ?
-पूर्णिमा देशमुख पुरेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा